बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक यंदा आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळ व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जायंट्स प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने खालील स्पर्धा अयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह दिली जातील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक पोतदार व जयंट्स प्राईडच्या अध्यक्षा सौ. आरती शहा यांनी दिली. सदर स्पर्धा रविवार दि. 4 सप्टेंबर रोजी महिला विद्यालय मराठी शाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.
१. घरगुती गणपती सजावट स्पर्धा
सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल. स्पर्धकांनी केलेली सजावट ही सामाजिक संदेश, अथवा एखाद्या विषयाशी निगडित असावी. प्राथमिक फेरीसाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या सजावटीचे व्हिडिओ स्पर्धा प्रमुख ना पाठवावा
स्नेहल शहा 9480398483
2 पाककला स्पर्धा
या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी गोड व तिखट दोन्ही मोदक बनवून आणायचे आहेत. मोदक हे नाविन्यपूर्ण असले पाहिजेत त्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री व बनवण्याची विधी हे स्वच्छ कागदावर लिहून आणावी. पदार्थाची सजावट स्पर्धेच्या ठिकाणी येऊन करावी लागेल. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख शी संपर्क साधावा
रश्मी पाटील 9901134212
३ गणपतीच्या आरतीचे ताट सजवणे
सजावटीचे ताट 12 इंची व काठाचे असावे. सजावटीचे सामान आयोजकांकडून देण्यात येईल. स्पर्धकांनी येताना लाल पिवळा हिरवा रंग घेऊन येणे गरजेचे असेल. प्राथमिक गरजेच्या वस्तू उदाहरणार्थ ब्रश, नॅपकिन, कात्री, पाणी, चिटकवण्याचे साहित्य स्पर्धकांनीच आणावयाचे आहे.
निरुपमा शहा 9481007642
४ क्ले पासून गणपती मूर्ती निर्मिती
क्ले पासून गणपती निर्मिती ही स्पर्धा पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी लागणारे साहित्य येताना घेऊन येणे व स्पर्धेच्या ठिकाणी गणपती मूर्ती तयार करणेचे आहे. मूर्तीची उंची साधारण सहा इंच असावी
श्रुती मेहता 9480291796
भाषण स्पर्धा
भाषण स्पर्धा ही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही स्पर्धा मराठी भाषेमधून घेण्यात येणार आहे. भाषण स्पर्धेचे विषय
सार्वजनिक उत्सव -समाज प्रभोधन
भाषणाचा कालावधी साधारण तीन ते पाच मिनिट असावा.
मोनाली शहा 6363201381
वरील स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत.