सीआयएसएफ जवान प्रशांत तरवाळच्या साहसी कार्याचे अभिनंदन
बेळगाव : कुद्रेमानी येथील सीआयएसएफचा जवान प्रशांत तरवाळने समुद्रामधील बुडणाऱ्या क्रू मेंबररांना वाचविले.
याबाबत माहिती अशी की, ५ मे च्या रात्री ९ . ३० वा पोर्ट जवळील डॉल्फीन क्षेत्रात करगो शीपमधून बार्झ नावाच्या शीप बर्थकडे येत असाताना बार्झमधून तुटली व त्याच्यामध्ये ९ क्रू मेंबर होते त्यापैकी ६ जण डाल्फीन यरिया मध्ये थांबले होते व ३ जण बुडत होते त्यांना प्रशांत तरवाळ व शेख बादशहा या जवानांनी वाचविले. धाडसी प्रशांत याचा mpt goa येथे सत्कार करण्यात आला. यामुळे नुकताच सुट्टीवर मूळगाव कुद्रेमानी येथे आला आहे. तेव्हा त्यांचा सत्कार ग्रामस्थांनी कृषी पतीन सेवा सोसायटी चेअरमन जोतिबा बडसकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन करण्यात आला.
जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून प्रशांत आणि त्याच्या सहकार्यांने तीन क्रू मेबरांचा जीव सीताफितीने वाचविले त्याच्या धाडसी, साहसीवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सीआयएसएफ जवान प्रशांत आपल्या युनिटचे सहासी वृती दाखविल्याने सत्कार करून त्यांना राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली आहे. यासाठी कुद्रेमानी मित्रपरिवाराच्या वतीने अनिनंदन करून सदिच्छा देताना रवी पाटील, सुरेश पाटील, मारुती मजुकर, मारुती शांताराम पाटील, संजय भावकाण्णा पन्हाळकर, गोमाणा सुतार व लखन धामणेकर.