कर्नाटक विभागात गेल्या सहा वर्षापासून सलग मान
अथणी : अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदारसंघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
आंध्र प्रदेशातील तिरूपती येथे नुकतीच दि साऊथ इंडियन शुगरकेन अॅन्ड शुगर टेक्नॉलिजिस्ट असोसिएशनची बैठक झाली. या ठिकाणी साखर उत्पादनाबरोबरच डिस्टीलरी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. अथणी शुगर्स लि., ने डिस्टीलरी युनिट सुरू केल्यापासून दर्जेदार उत्पादन व उत्तम व्यवस्थापन राखले आहे. याची दखल घेऊन सिल्वर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. डिस्टीलरी मॅनेजर किरण मुदाळे यांनी हे अॅवॉर्ड स्विकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे युनिट उत्तमरित्या सुरू आहे. याबद्दल व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी या टीमचे विशेष अभिनंदन केले आहे. श्रीनिवास पाटील यांनी याचे सर्व श्रेय अथणी शुगर्सचे चेअरमन व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील, संचालक मंडळ, व्यवस्थापन यांना दिले आहे. राष्ट्रीय स्तरावर कर्नाटक विभागातून सलग सहावेळा डिस्टीलरी क्षेत्रात असे अॅर्वार्ड प्राप्त करणारा अथणी शुगर्स लि., हा एकमेव असल्याचा दावा व्यवस्थापन मंडळाने केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta