
बेळगाव : नव्याने बांधण्यात येत असलेल्या घरावर पत्रे घरावर चढवत असताना विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सूळगा (हिंडलगा) येथे ही घटना घडली आहे. विनायक कृष्णा कलखांबकर (वय 24, रा. सूळगा (हिं)), विलास गोपाळ अगसगेकर (वय 57, रा. बेनकनहळ्ळी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक (रा. बेनकनहळ्ळी) हा युवक जखमी झाला आहे.
विनायक कलखांबकर यांचे घर बांधण्याचे काम सुरु आहे. सोमवारी घरावर पत्रे चढवत असताना पत्र्याला विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्या ठिकाणी काम करत असलेल्या दोघांचा शॉक लागून जागीच मृत्यू झालायं. विलास अगसगेकर हे रिक्षा चालवतात; त्यामुळे गाडीतून आणलेले पत्रे उतरवून घरावर पत्रे चढवण्यासाठी घरमालक विनायक यांना मदत करत होते. विनायक हा वॉटर सप्लाय म्हणून काम करत होता. घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेने दोन्ही गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta