किरण जाधव यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे कपिलेश्वर तलावात दूषित पाणी मिसळल्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता. कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव श्री. किरण जाधव यांच्या निदर्शनास ही बाब येताच किरण जाधव हे स्वतः कपिलेश्वर तलावाकडे जाऊन आणि भाविकांना जक्कीनहोंडा येथे गणपती विसर्जन करण्याची विनंती केली व तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे किरण जाधव यांनी तात्काळ बेळगावच्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सदर घटनेची कल्पना देऊन तात्काळ पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे. तसेच नवीन कपिलेश्वर तलावात गणपती विसर्जनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून बेळगावच्या जनतेला अश्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच कपिलेश्वर तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा आयुक्तांकडे किरण जाधव यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta