
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे बिनधास्त नेते होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री उमेश कत्तीं निवासस्थानी भेट देऊन दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी कत्ती कुटुंबियांचे रमेश कत्ती, निखिल कत्ती, पवन कत्ती यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आपल्या भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणाले उमेश कत्ती आपले चांगले मित्र होते. दिल्ली दौऱ्यात असताना ते आपल्या भेटीसाठी यायचे. भेटीत कर्नाटकच्या सर्वांगिण विकासावर चर्चा करायचे. ते बिनधास्त आमदार होते. जे बोलायचे ते बिनधास्त बोलायचे. त्यांच्या मनात कपट नव्हते. राज्यात भाजपा संघटना कशी मजबूत करता येईल याविषयी ते चर्चा करायचे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कर्नाटक आणि भाजपचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यांनी उमेश कत्ती यांना ईश्वर चरणी चिरशांती लाभो अशी प्रार्थना केली.
यावेळी मंत्री डॉ. सुधाकर, एमटीबी नागराज, इरण्णा कडाडी, सिद्दराजू, संजय पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta