बेळगाव : बेळगाव सीमाभागातील मराठी भाषकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी परिपत्रके देण्यात यावीत, सरकारी कार्यालयातून मराठी भाषेत फलक लावण्यात यावेत. यासंदर्भात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने सातत्याने मागणी केली जात आहे. आपल्या मागणी संदर्भात म. ए. समितीच्या वतीने केंद्र सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. जून महिन्यात महाराष्ट्र एकिरण समितीने गृहमंत्रालयाला पाठविलेल्या विनंती वजा पत्रानंतर, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर कडून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या मुख्य सचिवांना बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांना त्यांच्या मराठी मातृभाषेत सरकारी कागदपत्रे देण्यात यावीत. सरकारी कार्यालयात राज्यभाषेबरोबरच मराठी भाषेतही फलक लावण्यात यावेत. निवडणुकीची कागदपत्रे मराठी भाषेतही अदा करण्यात यावी. या संदर्भात सूचना जारी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta