बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
विशाल महादेव मक्कळगेरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून चोरलेल्या एक हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा स्प्लेंडर आणि बजाज सिटी 100 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
उद्यमबाग पोलिस स्थानकाचे निरीक्षक रामण्णा बिरादार व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta