Sunday , September 20 2026
Breaking News

सामान्य माणसांकडून कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

Spread the love

संकेश्वर द(महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या आकस्मिक निधनाने हुक्केरी मतक्षेत्रातील लोकांना जबर धक्का बसलेला दिसत आहे. उमेश कत्तींच्या निधनाने गेले आठ दिवस सरले कत्ती कुटुंब आणि त्यांचे असंख्य अभिमानी चाहते दुःख सागरात बुडालेले दिसत आहेत. कत्ती कुटुंबियांच्या दुःखात राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते मंत्रिगण, केंद्रीय मंत्री खासदार, आमदार राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, सहभागी होताहेत तसेच सामान्य लोक देखील सहभागी होऊन माजी खासदार रमेश कत्ती, निखिल कत्ती, पवन कत्ती, पृथ्वी कत्ती यांचे सांत्वन करताना दिसताहेत. नेते मंडळींपेक्षा सामान्य लोकांकडून कत्ती कुटुंबियांचे केले जाणारे सांत्वन सर्वांचे डोळे पाणविणारे ठरलेले दिसताहे. हुक्केरी मतक्षेत्रातील विशेष करुन हुक्केरी आणि बेल्लद बागेवाडी येथील उमेश अण्णांचे निकटवर्तीय, चाहते आणि सर्वसामान्यांकडून केले जाणारे सांत्वन कत्ती कुटुंबियांना शक्ती बनलेली दिसताहे. माजी खासदार रमेश कत्ती यांना अलिंगण देऊन अश्रू ढाळणाऱ्या लोकांचे सांत्वन उपस्थितांचे डोळे पाणविणारे ठरलेले दिसताहेत. कत्ती कुटुंबियांवरील सामान्य लोकांचे अतुट प्रेम पाहून नेते मंडळीं अचंबित झालेले दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *