बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ एस. कलमणी यांची श्री. दिगंबरा जैन ग्लोबल महासभेची बेळगाव विभागसाठी माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून जैन समाजाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचा प्रचार-प्रसार करणारे बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ कलमणी यांची त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. दिगंबरा जैन ग्लोबल महासभा संस्थेतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. दिगंबरा जैन ग्लोबल महासभा संघटना ही आंतरराष्ट्रीय संस्था असून बेळगाव विभागातून प्रथमच पत्रकाराची नियुक्ती होणे ही या भागातील जैन समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
Belgaum Varta Belgaum Varta