
बेळगाव : दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी हिंडलगा येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, सेवा पाक्षिक ह्या अभियाना अंतर्गत भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. आरोग्य तपासणी, रक्त दान, सफाई, अंगणवाडी मुलाना जेवण आदी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. याचा जनतेने लाभ घ्यावा असे ते म्हणाले. व्यासपीठावर माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. नागेश मन्नोळकर, रामचंद्र मन्नोळकर, भाग्यश्री कोकीतकर, डॉ. सुभाष पाटील, बाळू पाटील, विलास ताशीलदार आदी उपस्थित होते. या शिबिराचा शेकडो लोकांनी लाभ घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta