Tuesday , March 3 2026
Breaking News

पिरनवाडी प्रकरणात म. ए. समितीच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

Spread the love

 

बेळगाव : 2020 साली पिरनवाडी येथे कन्नड संघटनांच्या वतीने संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, 27/8/2020 रोजी ग्रामीण पोलीस स्थानकाचे एएसआय श्री. पी. एल. तलवार यांच्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहितेतील कलम 143,147,148, 341,336 सहकलम 149 नुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हे नोंदविण्यात आले होते, पण प्रशासनाने त्याबाबत दोन वर्षानंतर समितीच्या 11 मराठी भाषिक तरुणांना अटक वॉरंट बजावले होते. त्याबाबत आज प्रथमदर्जा न्यायदंडाधिकारी द्वितीय मा. न्यायालयाकडून समिती आणि शिवसेनेच्या अकरा कार्यकर्त्याना विविध अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.
नारायन पिराजी मुचंडीकर, रामनाथ मुचंडीकर,चांगदेव मुचंडीकर, संतोष मुचंडीकर, राजू मुचंडीकर, महेश मुचंडीकर, किसन मुचंडीकर, मारुती राऊत, पिराजी शिंदे (शिवसेना उपतालुका प्रमुख), विजयानंद नेसरकर, यल्लाप्पा शिंदे
या सर्वांच्या वतीने समितीचे वकील ॲड. महेश बिर्जे, ॲड. रिचमॅन रिकी, ॲड.बाळासाहेब कागणकर यांनी कामकाज पाहिले. यावेळी समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *