बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. अंतिम फेरीत आठ सहा असे गुण मिळवित सुवर्णपदक पटकाविले. सृष्टी जाधव हिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसने यांचे प्रशिक्षण लाभत आहे. या स्पर्धा गोमटेश विद्यापीठ येथे भरविण्यात आल्या होत्या. यावेळी मास्टर गजेंद्र काकतीकर, मास्टर जितेंद्र काकतीकर, अमित वेसने, परशुराम काकती, निलेश गुरखा, विठ्ठल बोजगार, अक्षय प्रमोजी, हे उपस्थित होते. सृष्टी जाधव ही जीएसएस कॉलेजची विद्यार्थीनी आहे. सृष्टी जाधव या समाजसेविका माधुरी जाधव यांची कन्या आहे.
Belgaum Varta Belgaum Varta