बेळगाव : देशातील पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांवरील आयटी आणि ईडीने धाड टाकल्याच्या विरोधात बेंगळुरू-पुणे रास्ता रोको करून आंदोलन करणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांना बेळगावच्या काकती पोलिसांनी अटक केली.
पीएफआय कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. यावेळी आरएसएसच्या निषेधार्थ मुर्दा बादचा नारा देत केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. महामार्गावर किलोमीटर अंतरापर्यंत वाहने अडकून पडली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पीएफआय कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर घटनास्थळी आलेले मार्केट स्टेशनचे एसीपी एन. व्ही. भरमणी यांनी पीएफआय कार्यकर्त्यांचा क्लास घेतला. त्यालाही न जुमानता काकती पोलिसांनी पीएफआयचे अध्यक्ष नावेद कटगी यांच्यासह 10 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली. यानंतर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta