Tuesday , March 3 2026
Breaking News

बिजगर्णी येथे घर फोडून 54 हजार लंपास

Spread the love

 

बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 54 हजारांची रोख रक्कम लंपास केली. बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील कलाप्पा भास्कळ यांच्या घरी गुरुवारी ही घटना घडली. भर दुपारी झालेल्या धाडसी घरफोडीमुळे एकच खळबळ माजली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कल्लाप्पा भास्कळ पत्नी, मुलासमवेत नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत दुपारी 12 वा. सुमारास घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व  कपाटात ठेवलेले 54 हजार रुपये लंपास करून पलायन केले. याप्रकरणी कल्लाप्पा भास्कळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस तपास सुरू आहे.

भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे बिजगर्णी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *