Tuesday , March 3 2026
Breaking News

झिरो ट्रॅफिकमधून आले धारवाडहून बेळगावला हृदय!

Spread the love

 

बेळगाव : एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय धारवाड येथील एसडीएम रुग्णालयातून आज सकाळी झिरो ट्रॅफिकमधून बेळगावच्या केएलई रुग्णालयात आणण्यात आले. धारवाडहून आज शुक्रवारी पहाटे 4 वाजता निघालेली हार्ट ऍम्ब्युलन्स (हृदय घेऊन येणारी रुग्णवाहिका) पहाटे 5 वाजता बेळगावातील केएलई रुग्णालयात पोहोचली.
कोप्पळ जिल्ह्यातील कुनीकेरी तांडा येथील गिरीश सोमप्पा कुरी या 39 वर्षीय युवकाचा नुकताच धारवाडमध्ये दुचाकी चालवत असताना अपघात झाला. या अपघातात गिरीश गंभीर जखमी झाला. त्याच्या प्रकृतीत सुधारणाच न झाल्याने डॉक्टरांनी गिरीशला तपासून ब्रेन डेड घोषित केले. अपघातात मेंदू निष्क्रिय झाल्याने तो कोमात गेला होता. डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांना त्याचे अवयव दान करण्याबाबत चर्चा करून पटवून दिले. त्यानंतर कुटुंबियांनी अवयव दानास सहमती दर्शवली. गिरीश एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम करत होता. त्याला पत्नी आणि तीन मुले आहेत. केएलई रुग्णालयात गिरीशाचे हृदय हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीवर प्रत्यारोपण करण्यात आले आहे. हृदय प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *