बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या रोवर रेंजर युनिट चे उद्घाटन तसेच प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत माननीय सतीश बाचीकर यांच्या हस्ते करण्यात आले. व विद्यार्थ्यी प्रतिनिधीचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत अशोक चुडाप्पा हलगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमान प्रकाशराव नंदिहळी हे उपस्थित होते. प्रारंभी प्राध्यापक मयूर नागेनहट्टी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत संजना कोलकर व प्रशांत खूटाळे यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्या ममता पवार यांनी करून दिला उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सतिश बाचीकर व अशोक हलगेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मयूर नागेनहट्टी यांनी केले. तर शेवटी उपस्थित यांचे आभार कॉलेजचा जनरल सेक्रेटरी कुमार श्रेयस कुंडेकर याने केले.
Belgaum Varta Belgaum Varta