बेळगाव : कॅम्प परिसरातील एका युवकावर सोमवारी रात्री चाकू हल्ला करण्यात आला असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना शहरातील अनंतशयन गल्लीत घडली. दुचाकीवरून जात असताना टोळक्याला धक्काबुक्की करण्यात आली. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला दुसरा व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला.
फरान (16) या विद्यार्थ्यावर चाकूने वार करण्यात आले. फरान आणि त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी रस्ता दिला नाही आणि गोंधळ सुरू झाला. यावरून मारामारी होऊन एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Belgaum Varta Belgaum Varta