बेळगाव : अगदी ग्रामपंचायतीपासून 50 ते 60 फुटांवर रस्त्यापलिकडे लागुन असलेल्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर दारुप्रेमीनी खराब करून टाकलाय, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दारु विक्री, तसेच मद्यपान, धुम्रपान असे अनेक प्रकार होत आहेत, आणि आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे दारुच्या पाकीटांनी, प्लॅस्टिक बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास तसेच इतर कचर्यांनी साचलेला आहे. सूर्यास्तानंतर याठिकाणी दररोज हे कृत्य मद्यपान करणाऱ्यांकडून होत असतोय. पण प्रशासनाकडून यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
स्थानिक लोकांना होणारा दररोजचा त्रास तसेच तलावाच्या आजूबाजूचा परिसर संपूर्ण कचर्याने भरलेला आहे हे लोकप्रतिनिधींना कसा दिसत नाहीये असा प्रश्न नागरिक करत असतात…
येळ्ळूर ग्रामपंचायत ही सक्रिय ग्रामपंचायत म्हणून नावाजली जाते, पण गावात अनेक ठिकाणी मद्यपान करून संपूर्ण परिसर खराब करणार्यांवर कोणतीच कारवाई होत नाहीये, याला जबाबदार कोण? हे आपणच ठरवायचे आहे.
गाव असो वा गल्ली स्वच्छतेसाठी कोणत्याही निवेदनाची आवश्यकता नसते, पण काही लोकप्रतीनिधींची अपेक्षा असते की नागरिकांना लिखित निवेदन द्यावे. पण या गोष्टीची खंत वाटते. सर्वांगीण विकासाच्या नावाखाली गावामध्ये अनेक ठिकाणी केरकचरा असाच पडून आहे पण याकडे ग्रामपंचायतीच्या अधिकार्यांचे लक्ष नाहीये.
येळ्ळूर गावातील समस्या सोडविण्यासाठीच तर लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, समाजकंटकाकडून होणारी गावची दूर्दशा त्वरित थांबविण्यासाठी योग्य ती दंडात्मक कारवाई केल्यानंतर कोणतेच कृत्य होणार नाही.
येळ्ळूर गावातील समस्त नागरीकांना, युवापिढींना विनंती आहे की आपला परिसर स्वच्छ व्हावा यासाठी एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारणे ही काळाची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta