बेळगाव : श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29/9/22 रोजी सरस्वती सभागृहात खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी अध्यक्ष सुरेंद्र पाटणेकर, संचालक प्रकाश गोखले, सुरेश कनगली, रविंद्र लाड, राजाभाऊ चौगले, संस्थेचे कार्यवाह अनंत शानभाग यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या प्रस्ताविक भाषणात अध्यक्ष सुरेंद्र पाटणेकर यांनी सर्व ठेवीदार व कर्जदार तसेच सर्व सभासदांकडून मिळत असलेल्या सहकार्याचा उल्लेख केला व असेच सहकार्य पुढेही अपेक्षित असल्याचे सांगितले. संचालक मंडळाचा 20% लाभांश देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. संस्थेचे कार्यवाह अनंत शानभाग यांनी संस्थेच्या टाळेबंद व नफा तोटा हिशोब पत्र सादर केले त्याला सभेने एकमतांनी टाळ्याच्या कडकडाटात मंजुरी देण्यात आली. संस्थेचे जुने सभासद प्रदीप परवा आणि संध्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ योग्यरितीने संस्था चालवीत असल्याने नमुद केले तसेच संस्थेच्या कर्मचारी वर्ग यांच्या मिळत असलेल्या सहकार्याचा उल्लेख केला व संस्था इतरांच्या तुलनेने भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले. चार्टड अकाउंट महादेव शेवडे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला व योग्य मार्गदर्शन केले. जुने सभासद सुधीर जोशी यांनी आपल्याला संस्थेकडून व कर्मचारी वर्ग कडून मिळत असल्याचा सहकार्याचा उल्लेख केला व वेळ प्रसंगी आपणाला घरी बसल्या देखील पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. संस्थेचे हिशोब तपासणीस राजेंद्र केळकर यांनी संस्थेचे कार्य योग्यरितीने चालत असल्याचे सांगून संचालक मंडळाला व संस्थेला सुयश चिंतीले. संचालक श्रीधर सराफ यांनी कर्ज वसुली योग्य मार्गे चालू असून अनंत शानभाग यांच्याकडून योग्य ते सहकार्य मिळत असल्याचे सांगून त्याचे कौतुक केले. सर्व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याच्या व प्रामाणिकपणाचे कौतुक केले. पिग्मी संचालकामध्ये विशेष कार्य केल्याबद्धल अध्यक्षांच्याहस्ते गौरव करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन संचालिका संध्या शानभाग यांनी केली. संचालक प्रकाश गोखले यांनी आभार प्रदर्शन करताना प्रत्येक ठेवीदारांचे, कर्जदारांचे, संचालक श्रीधर सराफ, कर्मचारी वर्ग, पिग्मी वर्ग व संस्थेच्या प्रगतीस कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष व्यक्तीचे आभार मानले. सभेची सांगता राष्ट्रगीताने, चहापानाने झाली.