Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात छापा टाकून पीएफआयचे 7 जण ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : देशभरातील पीएफआय संघटनेवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी बेळगावच्या विविध भागात अचानक छापे टाकून पीएफआयच्या 7 कार्यकर्त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बेळगाव पीएफआय जिल्हाध्यक्ष नावीद कटगी यांच्या नेतृत्वाखाली काकतीजवळ आंदोलन करण्यात आले.
दरम्यान बेळगावातही पीएफआय संघटना सक्रिय असल्याची माहिती मिळताच डीसीपी रवींद्र गडाडी यांच्या नेतृत्वाखाली अचानक कारवाई करत संघटनेच्या नेत्यांना अटक केली.
एसीपी नारायण भरमणी, सदाशिव कट्टीमणी यांच्यासह विविध पोलिसांच्या पथकांनी माळमारुती, टिळकवाडी, मार्केट आणि एपीएमसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *