बेळगाव : शिक्षण खात्यामार्फत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मराठा मंडळाच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. मलप्रभा पाटील हिने लांब उडी व तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ज्युडोमध्ये राधिका डुकरे, राजेश्वरी कोडचवाडकर हिने प्रथम क्रमांक. सुमित पाटील याने द्वितीय क्रमांक. तसेच कराटेमध्ये श्रुती जोमणे प्रथम व नंदनी गावडे हिने द्वितीय व कुस्तीमध्ये रामदास मुळेराखी व श्रीधर घबळे याने द्वितीय क्रमांक मिळवला. थ्रो बॉलमध्ये अश्विनी गेणूचे व संपदा कणबरकर आणि भगत अखानोजी याची राज्य पातळीवर निवड झाली. त्याचबरोबर खो-खो मध्ये सानिका कुत्रे, सानिका मोरे, साक्षी नंदगडकर यांची सुद्धा राज्यपातळीवर निवड झाली. या सर्वांना मराठा मंडळच्या अध्यक्ष राजश्री नागराजन हलगेकर तसेच कॉलेजचे प्राचार्य श्रीमान एस. एस. पाटील व क्रीडा शिक्षक चंद्रकांत गोमानाचे यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta