बेळगाव : गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी, बेळगाव यांच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना (बीडीसीए) यांच्या सहयोगाने अखिल भारतीय एकदिवशीय खुल्या (बिलो 1600 ओपन रॅपिड चेस टोर्नमेंट) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी ओल्ड पी.बी. रोड, खासबाग- बेळगाव येथील साई भवन येथे ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
ही स्पर्धा 8 वर्षांखालील, 10 वर्षाखालील, 12 वर्षांखालील, 14 वर्षांखालील, आणि 16 वर्षांखालील वयोगटात घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 50 हजार रुपये रोख रकमेची बक्षिसे आणि 59 स्मृतीचिन्ह व 5 पदके देऊन सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय 50 वर्षांवरील दोघां बुद्धिबळपटूंना उत्कृष्ट जाणते बुद्धिबळपटू म्हणून रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन तसेच 16 वर्षांवरील महिला गटातील दोघां उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटूंना रोख रकमेची बक्षिसे आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व बुद्धिबळपटूंना प्रोत्साहनार्थ प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
खुल्या गटासाठी प्रवेश शुल्क 500 रुपये तर 16 वर्षांखालील गटासाठी प्रवेश शुल्क 400 रुपये ठेवण्यात आले आहे. स्पॉट एन्ट्री घेतली जाणार नाही. खेळाडूंसाठी स्पर्धा आयोजन समितीच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेला आरबीटर म्हणून कोल्हापूरचे इंटरनॅशनल आरबीटर भरत चौगुले काम पाहणार आहेत. बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश भंडारी व उपाध्यक्ष दत्तात्रय डी राव यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता स्पर्धेला चालना दिली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धेनंतर सायंकाळी पारितोषिक वितरित केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रशांत अणवेकर 9535308451, महेश निटूरकर 8147350134, सक्षम जाधव 7899425214, अक्षता पाटील 8951409037 अथवा रचना अनगोळकर 8879373331 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta