
बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गेल्या साडेचार वर्षात बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची क्रांती घडवून आणली असून, आगामी काळात विकासाला गती देणार असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
पंत बाळेकुंद्री गावातील बालमुकुंद कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुदानातून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार होण्यापूर्वी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी यापूर्वीच अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिली होती. आमदार झाल्यानंतर सरकारकडे सातत्याने प्रयत्न करून हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प आणले. दरम्यान, पूर, कोरोना आदी समस्यांना तोंड द्यावे लागले. पण कशाचीही भीती न बाळगता, तब्येतीचाही विचार न करता त्यांनी अथक परिश्रम घेतले. कठीण प्रसंगी लोकांच्या पाठीशी उभ्या आहेत. प्रत्येक गावात आमदारांच्या कामाचे लोक कौतुक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नजीकच्या भविष्यात या क्षेत्रात अनेक मोठे प्रकल्प आणण्याची योजना आहे विशेषत: तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प. त्या दिशेने आपण यापूर्वीच प्रयत्न केले असल्याचे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांनी श्रीपंत महाराजांच्या दरबारात जाऊन श्रीपंत महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी गावातील वडीलधारी मंडळी मैनुद्दिना अगसिमनी, अप्सर जमादार, गुलाबी कोलकार, पार्वती तलवार, मलिक मनियार, मोहम्मद जमादार, उमेशराव जाधव आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta