बेळगाव : शिमोगा महानगरपालिका आणि कर्नाटक रोलर स्केटिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलामुलींच्या राज्यस्तरीय खुल्या दसरा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटुनी अभिनंदन यश मिळविले आहे.
शिमोगा येथे गेल्या 27 सप्टेंबर रोजी मुला मुलींच्या राज्यस्तरीय खुल्या दसरा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत बेळगावच्या आराध्या पी. हिने 1000 मी. स्पीड स्केटिंग रिंग रेसमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक तर आर्या कदम हिने 1000 मी. रिंक रेसमध्ये रौप्य पदक आणि 500 मी. रिंग रेस मध्ये कांस्यपदक पटकाविले. आर्या व आराध्या या दोघी गेल्या 4 वर्षापासून केएलई सोसायटीचे स्केटिंग रिंक, रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमीचे स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात.
सदर यशस्वी स्केटिंगपटूंना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर व विठ्ठल गगणे यांचे मार्गदर्शन तसेच डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, माजी आमदार रमेश कुडची, राज घाटगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सरचिटणीस इंदुधर सिताराम, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta