Monday , April 20 2026
Breaking News

…चक्क आजी सहीसाठी आयसीयूतून उपनिबंधक कार्यालयात

Spread the love

 

उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा माणुसकीशून्य कारभार

बेळगाव : बेळगाव सब रजिस्ट्रार, कर्मचाऱ्यांचा माणुसकीला काळिमा जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिलेला सहीसाठी चक्क आयसीयूतून कार्यालयात बोलावून बेळगाव उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
या घटनेत सब रजिस्ट्रार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हट्टापायी एका वृद्ध महिलेला हॉस्पिटलच्या चक्क आयसीयूमधून सही करण्यासाठी कार्यालयात बोलवावे लागले आहे. कुटुंबीयांनी वृद्ध महिलेला खाटेवरूनच उपनिबंधक कार्यालयात आणले. बेळगावच्या महादेवी आगसिमनी या 80 वर्षीय वृद्ध महिला प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात आयसीयूत उपचार घेत आहेत. मालमत्ता वाटणी आणि मालमत्ता हक्क करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक होते. त्यासाठी आजी महादेवी आगसिमनी यांचा अंगठा आणि सही आवश्यक होती. आजी आयसीयूमध्ये असल्याने उपनोंदणी अधिकाऱ्यांना रुग्णालयात येण्याची विनंती कुटुंबीयांनी केली होती. मात्र सब-रजिस्ट्रार पद्मनाभ गुडी यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन सही करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. रुग्णालयात येऊन आजीच्या हाताचा अंगठा घेण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पैसे देण्याचे मान्य न करता कुटुंबीयांनी आजीला कार्यालयात आणले. हॉस्पिटलच्या बेडवरूनच आजीला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कुटुंबीयांनी आणले. आजी ऑफिसमध्ये येऊन हॉस्पिटलच्या बेडवर सही करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या माणुसकीशून्य कारभारामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *