बेळगाव : सार्वजनिक श्री नवरात्र उत्सव एसटीएम समर्थ नगर बेळगाव येथे आज बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी सहकुटूंब भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आजची श्री भवानी मातेची आरती जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांच्यावतीने सहकुटूंब करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांचा एसटीएमच्या सुनील कणेरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta