
बेळगाव : सीमाप्रश्न हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
आमदार निलेश लंके आज बेळगावला आले असता त्यांनी तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला सदिच्छा भेट दिली.
बँकेचे चेअरमन, समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
म. ए. समितीचे चिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सीमाप्रश्नी सुरू असलेल्या चळवळीची माहिती दिली.
यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, सीमाप्रश्नाची खऱ्या अर्थाने जाण असणारे नेते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि हा प्रश्न पवार साहेबांच्या माध्यमातूनच निकालात लागू शकतो. समितीच्या शिष्टमंडळाची व शरद पवार, जयंत पाटील यांची भेट घडवून आणू व सीमाप्रश्नासंदर्भात लढ्याची पुढची दिशा ठरवू व हा प्रश्न आपण नक्कीच सोडवू. सीमाप्रश्न हा माझ्या घराचा प्रश्न आहे असे मी मानतो. विधिमंडळात तसेच नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील आपण हा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार व शक्य तेवढ्या लवकर सीमाप्रश्न तडीस लावण्यास आपण कटिबद्ध आहोत.
यावेळी विकास कलघटगी यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta