येळ्ळूर : येळ्ळूर येथे भग्न झालेल्या गणेश मूर्तींचे सर्व लोकसेवा फौंडेशनच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. ज्या गणेश मूर्तींना तडा गेला असेल किंवा रेखीव नसतील अथवा भग्न झालेल्या मूर्ती भाविक खरेदी करत नाहीत, मूर्तिकार अथवा विक्रेते देखील त्या मूर्ती तशाच ठेवतात. अपवादात्मक परिस्थितीत काही विक्रेते अथवा मूर्तीकार अशा मूर्तींचे विसर्जन करतात. पण ज्या मूर्तींचे विसर्जन झाले नाही त्या कित्येक वर्षे तशाच ठेवल्या जातात. अशीच समस्या येळ्ळूर गावात देखील पाहायला मिळाली. विक्रेत्यांनी भग्न श्रीमूर्ती स्मशानभूमी, सरकारी दवाखाना अशा ठिकाणी ठेऊन दिल्या होत्या, ज्या श्रींच्या म्हणजेच गणेशाच्या नावाशिवाय कोणतेही मंगल कार्य पूर्णत्वास जात नाही अशा श्रींच्या मूर्तींची वाताहत येळ्ळूर येथील ग्रामपंचायत अध्यक्ष व गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्यांना पाहवली नाही, त्यांनी बेळगाव परिसरामध्ये भग्न प्रतिमांचे संकलन करणारे व प्रत्येक गरजूंना साहाय्य करणारे सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ व त्यांच्या सदस्यांना याची माहिती दिली. त्यांनी देखील त्याच तत्परतेने त्यांना प्रतिसाद दिला आणि तत्काळ येळ्ळूर गावात दाखल झाले. यावेळी सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी त्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केले, तसेच ही समस्या थोड्या फार फरकाने सर्वच ठिकाणी आढळते त्यासाठी नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता भग्न झालेल्या श्रींच्या मूर्त्यांचे विसर्जन करावे व ज्या लोकांना अथवा मंडळांना हे शक्य नाही त्यांनी लोकसेवा फौंडेशनशी संपर्क करावा, असे आवाहन केले.
यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, श्रीचांगळेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील, बाळकृष्ण पाटील, हेमंत पाटील, विश्वनाथ पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, केदारी कुंडेकर तसेच श्रीकांत मोरे उपस्थित होते.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …