Sunday , December 14 2025
Breaking News

जितो संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : संजय पाटील

Spread the love

 

बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनची जितो बेळगाव शाखा अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असून या संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील शगुन गार्डन हॉल येथे जितो संस्थेच्या सन 2022-2024 या वर्षासाठीच्या नवीन व्यवस्थापन मंडळाच्या उद्घाटन समारंभात ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षात जितो संस्था विविध क्षेत्रात निस्वार्थपणे समाजसेवा करत आहे. त्यामुळे जितो संस्थेने लोकांच्या मनात खूप नावलौकिक मिळवला आहे. जितो संस्थेचे सामाजिक कार्य असेच सुरू राहावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शांती फोम्यॅक संस्थेचे उपाध्यक्ष शांतिलालजी पोरवाल म्हणाले की, जितो संस्था ही एका कुटुंबासारखी आहे. या कुटुंबात सर्वजण एकत्र काम करत आहेत. या एकजुटीचा परिणाम म्हणून आज बेळगावात जितो वतीने विद्यार्थिनी होस्टेल बांधला गेला आहे. येत्या काळात रुग्णालय किंवा शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे ते म्हणाले.
या सोहळ्याला उद्योजक भरत पाटील उपस्थित होते. याच प्रसंगी अभय आदिमानी यांना जितोरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी अध्यक्ष पुष्पक हणमन्नवर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली.
समारंभात जितो बेळगाव विभागाचे नूतन अध्यक्ष म्हणून मुकेश पोरवाल, उपाध्यक्षपदी वीरधवल उपाध्ये प्रवीण समसुखा, सरचिटणीसपदी नीतीन पोरवाल, सचिवपदी अशोक कटारिया, खजिनदारपदी आकाश पाटील, सहकोषाध्यक्षपदी विजय पाटील, हर्षवर्धन इंचल, विक्रम जैन, गौतम पाटील यांनी सदस्य म्हणून व्यवस्थापन मंडळाचे पदभार स्वीकारला.
यावेळी संस्थेचे नूतन सदस्य भुजाबली पसाणे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीता भोज भोजन्नवर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *