Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव येथील विद्यार्थ्याची मुचंडीजवळ निर्घृण हत्या

Spread the love

 

बेळगाव : छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवाशी असलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावच्या शिवारात घडली आहे. काल रात्री एका विद्यार्थ्याची हत्या करून अज्ञात मारेकर्‍यांनी मुचंडी गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे आज गुरूवारी उघडकीस आले.
बेळगावच्या छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवासी असलेल्या प्रज्वल शिवानंद करिगार या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. शहरातील जी. ए. हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी असल्याचे त्याच्या गणवेशावर समजून आले आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. एका कोवळ्या विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीने निर्घृण खून झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डीसीपी रवींद्र गडादी, ग्रामीण विभागाचे एसीपी गिरीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून मारिहाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *