Wednesday , March 4 2026
Breaking News

राज्य विद्याभारती ॲथलेटिक स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंचे यश

Spread the love

 

बेळगांव : बळ्ळारी येथील बालभारती केंद्रीय विद्यालय शाळेच्या मैदानावर बळ्ळारी विद्याभारती जिल्हा संघटना आयोजित राज्यस्तरीय विद्याभारती ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या क्रीडापटूंनी 2 सुवर्ण 2 रौप्य 5 कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्राथमिक गटात मुलांच्यात अब्दुल्ला मुल्ला यांने 80 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक, श्रद्धा कोल्हापूरने 400 मीटर धावणे कास्यपदक, तर माध्यमिक गटात वैभव मरगाळेने 200 व 400 मीटर धावण्यात 2 रौप्यपदक, नागेश सावरगीने भालाफेक रौप्य, 3000 मीटर धावणे कास्य, स्वरूप हलगेकरने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण, वेदांत बुद्रुकने 5 किमी चालणे, साई बसरीकट्टीने 3 किमी चालणे, व मंथन बंडाचे यांने हातोडाफेक या प्रकारात कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वरील सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, निरज सावंत, मयुरी पिंगट, गौतम तेजम, चंद्रकांत तुर्केवाडी, यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, बेळगाव जिल्हा विद्याभारती अध्यक्ष राघवेद्र कुलकर्णी, कर्नाटक राज्य विद्याभारती अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

बेळगांव राज्य विद्याभारती अथेलिटीक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंसमवेत परमेश्वर हेगडे, राघवेंद्र कुलकर्णी, सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, निरंज सावंत, मयुरी पिंगट.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *