Sunday , July 26 2026
Breaking News

भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

Spread the love

 

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे.

महिन्याच्या सुरुवातीलाही झालं होतं हेलिकॉप्टर क्रॅश

अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीलाही अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की, “तवांगजवळील फॉरवर्ड एरियामध्ये उड्डाण करणारं आर्मी एव्हिएशन चिता हेलिकॉप्टर 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नियमित उड्डाण करताना क्रॅश झालं. दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं असून तिथे पायलटचा मृत्यू झाला होता.”

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *