Wednesday , March 4 2026
Breaking News

बाल शिवाजी भक्त मंडळाच्या किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने साकारलेल्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

दीपावलीनिमित्त वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने यंदा महाराष्ट्रातील मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. सदर किल्ल्याचा उद्घाटन समारंभ काल सोमवारी आयोजित केला होता. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विजय देवगेकर, उदय तानोजी, रवींद्र शिंगारे, विनायक साळुंखे व धोंडूचा रायबागी उपस्थित होते. देवगेकर यांच्या हस्ते फीत कापून किल्ल्याचे उद्घाटन झाले. यावेळी तानोजी यांनी श्रीफळ वाढविले तर शिंगारे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे साळुंखे आणि रायबागी यांच्या हस्ते अनुक्रमे किल्ला व भगव्या झेंड्याचे पूजन झाले. प्रमुख पाहुण्यांना वीरेंद्र पाटील यांनी किल्ल्याच्या प्रतिकृतीची माहिती दिली.

याप्रसंगी गल्लीतील नागरिकांसह बाल शिवाजी भक्त मंडळाचे श्रेयस पाटील, तन्मय पाटील, अरुण पाटील, श्री पाटील, अवधूत पाटील, अनुष वेर्णेकर, श्रेयस शिंगारे, साईश यलजी, राजवीर देसाई, स्वराज्य कंग्राळकर, आराध्या पाटील, अंजण्या पाटील, खुशी रायबागी, तनिष्का पाटील, तेजस शिंगारे, श्रुती पाटील, कार्तिक सिद्धनाथ व अविया तकेनीय उपस्थित होते. या सर्व कार्यकर्त्यांनी भारतगड किल्ला साकारण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. किल्ला उद्घाटनानंतर वीरेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *