Wednesday , March 4 2026
Breaking News

‘अविघ्न क्लासिक, श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा रविवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने पवन काकतकर व टीम आयोजित आणि युवा भाजप नेते किरण जाधव पुरस्कृत ‘अविघ्न क्लासिक -2022’ ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि ‘अविघ्न श्री -2022’ ही जिम पातळीवरील सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबईच्या अटी नियमानुसार भाग्यनगर टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे या शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत. जिल्हास्तरीय अविघ्न क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलो वरील गट कशा सात वजनी गटात घेतली जाईल.

प्रवेश शुल्क 100 रुपये असलेल्या या स्पर्धेत जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेशी संलग्न असणारे शरीरसौष्ठवपटू भाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 3000 रु., 2000 रु., 1500 रु., 1000 रु. व 1000 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

बेस्ट पोझरसाठी 1111 रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले असून टायटल विजेत्यास रोख 7111 रु., मेडल, प्रमाणपत्र व शास बेल्ट बक्षीसा दाखल देण्यात येईल. अविघ्न श्री -2022 या जिम पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील टॉप टेन स्पर्धकांपैकी पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 3000 रु., 2000 रु., 1500 रु., 1000 रु. व 1000 रुपये अशी रोख बक्षिसे दिली जातील. त्याचप्रमाणे 6 ते 10 क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील.

येत्या रविवारी स्पर्धेपूर्वी म्हणजे दुपारी 3 ते 4 या कालावधीत स्पर्धकांची वजन तपासणी होईल. तरी सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी अजित सिद्दन्नावर (9844063043), सुनील राऊत (9620407700), ओंकार (9972052085), विघ्नेश (8660576788) अथवा मनोज (9900556657) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पोतदार व सिक्रेटरी गंगाधर एम. यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *