बेळगाव : अलतगा ता. बेळगाव येथील खडी मशीननजीक दगडखाणीत तीन दिवसांपूर्वी बुडून मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह आज सापडला. तीन दिवसांपूर्वी ही दुर्देवी घटना घडली होती.
मंगळवारी सांयकाळी, तीन मित्र खेळण्यासाठी अलतगा येथील खडी मशीन परिसरात गेले होते. यावेळी खडी मशीननजीक दगडाच्या खाणीत पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या सतीश हणमन्नवर (वय 22 रा. अनगोळ) या युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या जवानांची शोध मोहीम गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती.
या शोध मोहिमेदरम्यान आज, गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास बुडालेल्या युवाकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढताच मृत सतीशच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta