बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिर येथे कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संपूर्ण मंदिर आकर्षक रांगोळी आणि दिव्यांनी सजविण्यात आले होते. शांतीनगर महिला मंडळाच्या सर्व सभासद भगिनींनी संपूर्ण मंदिरात दिव्यांची रोषणाई केली होती.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, सौ.मधूश्री पाटील, सौ. विजया निलजकर, सौ.रूपा कोटरस्वामी, श्री. अरुण पाटील, दयानंद हिशोबकर, उदय पाटील मंदिराचे पुजारी दिनानाथ कुलकर्णी तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta