बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकाळी सेवा केंद्र यांच्यामार्फत विविध गुणदर्शनच्या कार्यक्रम डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबिटीस क्लिनिकमध्ये शनिवारी संपन्न झाला. प्रारंभी रवींद्रनाथ जुवळी यांनी गीत सादर केले. त्यानंतर डॉक्टर सुचिता हवालदार यांनी दातांची निगा कशा प्रकारे ज्येष्ठांनी ठेवावी. याची सविस्तर माहिती दिली. तसेच दात खराब होण्याचे प्रमुख कारण दात स्वच्छ न धुणे फास्ट फूडचे सेवन साखरेचा अतिरिक्त आहारात वापर ब्रश करण्याची पद्धत पेस्टचा वापर याचे सविस्तर स्पष्टीकरण केले.
तसेच ज्या ज्येष्ठांना बीपी आहे. त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याचे सविस्तर विश्लेषण दिले त्याचप्रमाणे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी दातांची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे. वयोमानानुसार दातांच्या बदल कसे होतात त्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे याचे सविस्तर स्पष्टीकरण केले.
त्यानंतर डॉक्टर सुचिता हवालदार यांनी सर्वांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी अध्यक्ष व्ही. एन. धुराजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न केला. यावेळी या कार्यक्रमात खजिनदार गुरुनाथ शिंदे, मंगला पाटील, मोहन सप्रे, वनिता कुलकर्णी, नागेश चौगुले, ए. के. जोशी, अरविंद मुतगेकर, नारायण बाळेकुंद्री यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta