Sunday , July 26 2026
Breaking News

बेनकनहळ्ळीत रस्ते बांधकामाचा शुभारंभ

Spread the love

 

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बेनकनहळ्ळी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 45 लाख रु. अनुदान मंजूर केले आहे. आज महालक्ष्मी नगर, बेनकनहळ्ळी येथे स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला असून बहुतांश रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. पुढील विकासासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संभाजी खोत, मोहन सांबरेकर, यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *