बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयाच्या उद्योगकोष आणि एनआयआयटीच्या संयुक्त आश्रयाखाली आयसीआयसीआय बँकेमध्ये नियुक्तीसाठी उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे उद्योग कोष अधिकारी डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी या मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले. या मेळाव्याला उपस्थित असलेले एनआयआयटीचे अधिकारी रघुवीर कुलकर्णी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, नोकरी प्राप्त करण्यासाठी उत्तम गुणांकाच्या सोबतीने उत्तम संभाषण कला सुद्धा आवश्यक आहे. उत्तम संभाषक आपल्या जीवनामध्ये नक्कीच सफल बनू शकतो.
या मेळाव्याला कला, वाणिज्य आणि विज्ञान विषयाचे अनेक पदवीधर उपस्थित होते. या मेळावा आयोजनाला प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. मनोहर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला डॉ. डी. एम. मुल्ला, प्रा. जगदीश यळ्ळुर आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta