जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
बेळगाव : दिव्यांग पेन्शन वाढीसह दिव्यांगांच्या मुलांना मोफत शिक्षणासह शासकीय अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांनी आज बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश रोट्टी म्हणाले की, 75 ते 100 टक्क्यांपर्यंत शारीरिक अपंगत्व असलेल्याना शासनाकडून 1400 रु.पेन्शन दिली जाते मात्र सध्याच्या वाढत्या महागाईत 1400 रु. पेन्शनवर दैनंदिन खर्च करणे खूप कठीण बनले आहे. त्यामुळे सरकारने दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ करून ती महिना 5000 इतकी करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
निवेदनाचा स्वीकार करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी ते निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे धडण्याचे आश्वासन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta