बेळगाव : महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील जोडपे त्यांना घरातून त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले आहे त्यानंतर त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले. जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी आसरा घेतला होता. तेथून जाणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना रडत बसलेले पाहून त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे सांत्वन केले याची माहिती सुनंदा पाटील यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांना देण्यात आली. माधुरी जाधव यांनी घटनास्थळी जाऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव अंबर साळुंखे (वय 75) आणि कौशल्य साळुंखे (वय 65) आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे काही ओळखपत्रही नव्हते त्यानंतर माधुरी जाधव यांनी टिळकवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी डोली सर आणि शिवानंद सर यांच्याशी संपर्क साधून यांच्या बद्दल मिळालेली पूर्ण माहिती त्यांना दिली पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून त्यांना सुखरूपपणाने त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. याकरिता समाजसेवक विजय शिंगटे, हेमंत पाटील व पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta