बेळगाव : मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा सुधारणा समितीच्या एसडीएमसी नूतन अध्यक्षपदी सिद्राय होनगेकर यांची निवड करण्यात आली आहे.
मण्णूर येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सीएसी कमिटीचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एसडीएमसी समितीची पुनर्रचना बैठक आज बुधवारी सकाळी पार पडली. याप्रसंगी नागेश चौगुले, मधु चौगुले आदी सदस्य उपस्थित होते. सदर बैठकीत चर्चेअंती निवडणूक होऊन शाळा एसडीएमसी समितीची पुढील प्रमाणे नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष -सिद्राय होनगेकर, उपाध्यक्ष -यशोदा गोविंदाचे, सदस्य -गजानन लोहार, मनोहर सांबरेकर, महेश मारुती पुजारी, अशोक कल्लाप्पा सांबरेकर, लक्ष्मण कलाप्पा काकतकर, विजय मारुती मंडोळकर, चाडोबा कोल्हापुरे, बसवंत बड्याचे, कल्लाप्पा तरळे, सुजल चौगुले, अनुराधा चौगुले, सुनिता सांबरेकर, सरिता कदम, उमा सुतार, माया बाळेकुंद्री, सविता नाईक व लक्ष्मी काकतकर.