Sunday , September 8 2024
Breaking News

बेळगावची कन्या लेफ्टनंट कर्नलपदी

Spread the love

बेळगाव : लष्करात अलीकडे मुलींसाठी दरवाजे खुली झालेली असताना बेळगावच्या कन्येने लष्करात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत झेप घेऊन यशाला गवसणी घातली आहे. येळ्ळूरच्या लेकीची पंकजा कुगजी यांनी ही किमया करून दाखवली असून या उच्च पदावर पोचलेल्या त्या बेळगावच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
देश सेवेबाबत बालपणापासून वडील निवृत्त सुभेदार अनंत परशुराम कुगजी यांच्याकडून बाळकडू घेतलेल्या पंकजा यांना लष्करी सेवा आणि लष्करातील अधिकार पद खुणावत होते. सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून सेवा बजाविण्याचे स्वप्न उराशी बाळगून शालेय व महाविद्यालय दशेत त्यांनी तयारी सुरू केली. 2003-04 मध्ये बेळगावमध्ये पदवी शिक्षण घेत असताना आर्मी ऑफिसर पदाच्या भरतीबाबत अर्ज मागविले. खडतर वाटणारे आव्हान यशस्वीपणे पार करून अखेर त्या लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या या सेवेला आता 17 वर्षे झाली असून लेफ्टनंट कर्नल म्हणून सध्या सेवा बजावीत आहेत. लष्करी अधिकारी ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत त्यांनी संपादित केलेले यश आश्वासक आणि प्रेरणादायी ठरले आहे.
लष्करातील इंजिनियरिंग विभागात संरक्षण यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणार्‍या खूप कमी महिला अधिकारी असून यात आता पंकजा यांनी आपली छटा उमटवली आहे. पंकजा यांचे पती अमोल माळी मेजर होते. 5 वर्षे सेवा बजावून निवृत्त झाले. सध्या ते एका खासगी कंपनीत बजावीत आहेत. प्रियंका यांचे वडीलही निवृत्त जवान आहेत. यामुळे पंकजा यांचे प्राथमिक ते 12 वी पर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मराठा मंडळ इंजिनियर महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पूर्ण केली. त्यानंतर आर्मीमध्ये ओटीए (ऑफिसर ट्रेनिंग अकादमी-चेन्नई) येथे 2004 प्रशिक्षण घेतले. अरुणाचल प्रदेश येथे पहिल्यांदा पोस्टींग होऊन सेवा बजाविण्यास सुरु केली व आता त्यांच्या सेवेला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *