
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर केलेल्या दडपशाहीविरोधात गावागावांतून निषेध करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पण, आज कन्नड संघटनेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे मंत्र्यांना जिल्हाबंदी आणि मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाची दखल घ्यावी, घटनात्मक हक्कांच्या पायमल्लीची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यासाठी म. ए. समिती नेते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले होते. त्यावेळी पोलिसांनी दडपशाही करून त्यांना अटक केली. सरकारच्या या कारवाईविरोधात येळ्ळूर विभाग, उचगाव विभाग, शहापूर विभाग म. ए. समितीसह कंग्राळी खुर्द, मंडोळी, हंगरगा, सावगाव, बेनकनहळ्ळी, आंबेवाडी, मण्णूर, बेळगुंदी आदी गावांतून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
कंग्राळी खुर्दमध्ये असा निषेध
कंग्राळी खुर्द येथे कर्नाटक शासनाच्या दडपशाहीचा तीव्र निषेध-महापरिनिर्वाण दिना-दिवशीच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान
कंग्राळी खुर्द – संविधानिक मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आज बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता कर्नाटक सरकारने दडपशाही करून संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चाळीसहून अधिक नेत्यांना अटक केली. याचा आम्ही “महाराष्ट्र एकीकरण समिती कंग्राळी खुर्द” यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी कंग्राळी खुर्द म. ए शाखेच्या वतीने करण्यात आली . यावेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष भाऊ पाटील, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, शेतकरी संघटनेचे नारायण पाटील, प्रल्हाद पाटील, बाबू पावशे, जोतीबा पाटील, विनय पाटील, विशाल पाटील, मंजूनाथ पाटील यांचेसह म. ए. समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta