बेळगाव : माजी आमदार आणि जेडीएस नेते कल्लाप्पा मेघन्नावर यांच्या कारला बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराच्या हद्दीत अपघात झाला.
विजयपूरहून चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावाकडे येत असताना हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. समोरून येणाऱ्या लॉरीचा टायर फुटून माजी आमदारांच्या गाडीवर पडला.
कारमधील मेघन्नावरसह अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta