बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मंडोळी हायस्कुल मंडोळी येथे गुरुवार दि 29/12/2022 रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. पी. मिसाळे यांनी केले. ध्वजारोहण श्री. परशराम भावकू पाटील यांच्याहस्ते झाले तर क्रीडाज्योत लक्ष्मीट्रेडरचे मालक श्री. अभिषेक अनंत सुतार यांच्या हस्ते स्वीकारण्यात आली. क्रीडासाहित्य पूजन एस. डी. एम. सी. सदस्य यल्लाप्पा कणबरकर यांच्या हस्ते पार पाडले उदघाटन प्रसंगी शाळा सुधारणा मंडळचे अध्यक्ष श्री. डी. एल. आंबेवाडीकर मामा, सदस्य श्री. एम. के. पाटील, सदस्य श्री. यल्लाप्पा कणबरकर यांनी शुभेच्छापर भाषण केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व प्रसिद्ध उद्योजक श्री. आर. एम. चौगुले यांनी थ्रो-बॉल सामन्याचे उदघाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी श्री. आर. एम. चौगुले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उदघाटन प्रसंगी एस.डी.एम.सी. सदस्य श्री. मारुती हुंदरे व श्री. पुंडलीक असोगेकर, पत्रकार श्री. रमेश चौगुले, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते श्री. सुनील आवडण, शाळेचे सर्व शिक्षक गावातील शिक्षण प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. एस. एन. बेळगुंदकर व आभार प्रदर्शन श्री. पी. पी. गोरल यांनी केले.