Sunday , September 8 2024
Breaking News

बेळगावात पुन्हा कानडी दादागिरी, मराठी बांधवांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली!

Spread the love

राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार
बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त करत आली आहे. पण कोरोना संसर्ग रोगाचे कारण पुढे करत बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी नाकारली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी कन्नड संघटनेच्या प्रतिनिधींनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला काळया दिनाची परवानगी देऊ नये तसेच मराठी लोकांवर दमदाटी करण्यार्‍या पालिका अधिकारी यांचा आदर्श बाकीच्या अधिकार्‍यांनी घ्यावा अशी मागणी केली. पण याचवेळी कोरोना नियमांचे पालन करत कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जावा अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
सीमाभागातील मराठी लोक काळा दिवस हा मराठी माणसावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ पाळतात. तो दिवस का कन्नड लोकांना डिवचण्यासाठी नसतो याचा विसर कन्नड संघटना आणि कर्नाटक प्रशासनाला कायम पडतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आता कोणता निर्णय घेणार याकडे सीमावासीय मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, बैठकीच्या सुरूवातीस दिवंगत कन्नड सेनानी रामचंद्र औवली, कल्याणराव मुचलंबी, पुष्पा हुब्बली आणि इतरांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. कर्नाटक संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी म्हणाले की, कर्नाटक राज्योत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. संपूर्ण शहर सुंदर सुशोभित केले पाहिजे. देखाव्यांना परवानगी द्यावी. सर्व प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे.
बेळगाव शहराच्या सर्व मंडळांमध्ये कन्नड झेंडे आणि पिवळ्या-लाल रंगाचे साहित्य ठेवावे. कर्नाटक राज्योत्सव सीमेवरील सर्व मराठी शाळांमध्ये साजरा केला पाहिजे. त्याचप्रमाणे, म. ए. समितीला काळा दिवस साजरा करण्याची परवानगी देऊ नये. केवळ एक दिवसाचा कन्नड कार्यक्रम नाही तर वर्षातील 365 दिवस हा कार्यक्रम करूया असेही ते म्हणाले. मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पोलिसांनी मिरवणुकीत अडथळा आणू नये. कोविड लसीकरणावर अधिक काम करण्याची सूचना केली.
यावेळी बोलताना श्रीनिवास टाळूकर म्हणाले की, गणेशोत्सव काळात समितीला चन्नम्माच्या कन्या लक्ष्मी निप्पाणीकरच्या रूपाने धाडसी उत्तर दिले होते. अशा अधिकार्‍यांचा आदर करत त्यांनी बेळगावातील कन्नड वाचवण्याचे काम केले आहे. जिल्हा अधिकार्‍यांनी याचे अनुकरण करावे अशी मागणी केली.
पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी राज्योत्सव परेड शांततेत होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
कन्नड भाषेच्या अंमलबजावणीवर भर देत दीपक गुडगनट्टी यांनी जिल्हा अधिकार्‍यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन केले.
अनंत ब्याकुड यांच्याबद्दल बोलताना, कन्नड राज्योत्सव पुरस्कारांचे मुख्य भाषण बेळगावच्या सुवर्ण मंदिरात झाले पाहिजे. बेळगाव कन्नड राज्योत्सवासाठी सरकारने विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *