Saturday , October 19 2024
Breaking News

बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये “फौंडर्स डे” निमित्त आंतरशालेय प्रतिभा संगम स्पर्धा यशस्वी

Spread the love

 

बेळगाव : बी. ई. संस्थेच्या बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये “फौंडर्स डे” निमित्त प्रतिभा संगम या नावाने आंतरशालेय स्पर्धा दि. २७ जानेवारी २०२३ रोजी शाळेच्या शाळेच्या आवरणात आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये चित्रकला, हस्ताक्षर, योगासन, प्रश्नमंजुषा व जानपद नृत्य सामील होत्या. बेळगाव तालुका व शहरातील वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आणि बक्षीसेही मिळवली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी श्री. श्रीपाद जोशी आणि श्रीमती अंजना जोशी उपस्थित होत्या. “आजच्या स्पर्धात्मक युगात असली स्पर्धा खहोप गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये साधेनेची जिद्द किंवा एक योग्य नागरिक बनण्यासाठी जी शिस्त आणि परिश्रम लागते ती आमची शाळा आधी पासून पुरवत आहे आणि आता हि पुरवते. त्या मुळेच बरेच नामवंत ह्या शाळेतून घडले. आणि हीच त्या फौंडर्स ना दिली जाणारी खरी श्रद्धांजली व सम्मान.” असे श्री श्रीपाद जोशीनी आपली भावना व्यक्त केली.

शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती शैला चाटे, वरिष्ठ शिक्षक श्री. सुरेश जोशी आणि स्पर्धा संयोजक श्री. वाय. पी. पाटील हे उपस्थित होते. यावेळी अमृता हुक्केरी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून श्री. आर. आय. गुरव यांनी आभार व्यक्त केला. विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व पालक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *