बेळगाव : युवजन सबलीकरण खात्याच्या योजनेअंतर्गत जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 10 लाख रुपयांच्या निधीतून येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे बांधण्यात आलेल्या नव्या व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
सदर उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि. पं. सदस्य रमेश परशराम गोरल हे होते. यावेळी प्रमुख पाहुण्या येळ्ळूर ग्रा.पं. उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर यांच्या हस्ते फित कापून प्रतिमा पूजन करण्याद्वारे व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले. नव्या व्यायाम शाळेच्या उभारणीसाठी सरकारच्या युवजन सबलीकरण खात्याच्या योजनेअंतर्गत सुमारे 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी रमेश गोरल यांचे येळ्ळूरवासियांतर्फे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य विकास बेडरे, पिंटू चौगुले, राकेश परीट, राजू डोनण्यानावर, कृष्णा बिजगरकर यांच्यासह गावातील युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच यल्लाप्पा गोरल, रमेश धामणेकर, चांगाप्पा धामणेकर, यल्लाप्पा पाटील, समित गोरल, बाळू गोरल, परशराम धामणेकर, प्रल्हाद गोरल, हेमंत पाटील, पप्पू कुंडेकर, विक्रम गोरल, विक्रम कुगजी, बसवंत कुंडेकर, किरण पाटील, भरमा नंदीहळ्ळी, पुरुषोत्तम गोरल, प्रताप गोरल आदी उपस्थित होते.